सावंतवाडी /-

सावंतवाडी येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी सावंतवाडी संचलित सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा, बालवाडी विभाग, कळसुलकर हायस्कूल, उच्च माध्यमिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळावर मात करत ‘शाळा बंद शिक्षण सुरू’ या शासनाच्या धोरणानुसार विविध उपक्रमांचे आणि स्पर्धांचे आयोजन ही संस्था शाळा स्तरावर करत आहे. शाळास्तरावर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्या सोबत आपल्या सावंतवाडी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांचे व पालकांचे मनोबल वाढवण्यासाठी संस्थेच्या मार्फत सावंतवाडी तालुकास्तरीय विविध स्तरांत विद्यार्थी गटनिहाय व शिक्षकां साठी विविध ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. ही स्पर्धा पंडित जवाहरलाल नेहरू अर्थात बालदिनाचे औचित्त साधून आयोजित केलेली आहे. या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय, व उत्तेजनार्थ असे क्रमांक काढून त्यांना संस्थेच्या मार्फत पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून देण्यात येणार आहे. सावंतवाडी तालुक्यातील अनुदानित प्राथमिक/ माध्यमिक /जिल्हा परिषद च्या मराठी माध्यमाच्या शाळातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी खालील नि:शुल्क स्पर्धांमध्ये दिनांक-6/11/2020 सायंकाळ पर्यंत वीडियो/फोटो खालील whats app संपर्क क्रमांकावर पाठवून उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे
बालस्पर्धा प्रकार
• *स्पर्धा क्र.१(बालवाडी)*- कृतीयुक्त वेशभूषा स्पर्धा. (विषयाचे बंधन नाही)
• *स्पर्धा क्र.२(पहिली,दुसरी)* – साभिनय बालगीत गायन स्पर्धा
• *स्पर्धा क्र.३(तिसरी व चौथी)* – साभिनय कथाकथन स्पर्धा.
• *स्पर्धा क्र.४ (५ वी व ६ वी)*- इंग्रजी कथाकथन स्पर्धा
• *स्पर्धा क्र.५ (७ वी व ८ वी)* हिंदी साभिनय वक्तृत्व स्पर्धा. (विषय:- पं.नेहरू यांच्या जीवनातील प्रसंग)
• *स्पर्धा क्र.६ (९ वी,१० वी)*
• साभिनय कथाकथन (संस्कृत) स्पर्धा
• *स्पर्धा क्र.७(११ वी,१२ वी)* – निबंध लेखन स्पर्धा. (विषय:- लॉक डाऊन मधील सकारात्मक प्रसंग) *शब्द मर्यादा – २०० शब्द.*
• *स्पर्धा क्र.८(शिक्षकांसाठी)* – प्रार्थना गायन स्पर्धा.
स्पर्धांबाबत अधिक माहितीसाठी तसेच नियमावली विषयी श्री. यू. आर.पाटील 9960187949, श्री.एस.पी.कुलकर्णी 9403073015, श्री.पी.बी.बागुल 9604008931, श्री.डी.जी.वरक 9423213972 या क्रमांकावर संपर्क करावा.

स्पर्धकांनी आपले व्हिडीओ/फोटो खाली दिलेल्या स्पर्धेच्या नावा समोरील whatsapp क्रमांकावर दि.6 नोव्हेंबर रात्री 8 वाजेपर्यंत पाठवयाचे आहेत.

१) कृतियुक्त वेशभूषा स्पर्धा- 9421966753,२) साभिनय बालगीत स्पर्धा-9404931665, ३) साभिनय कथाकथन स्पर्धा- 9405796720, ४) इंग्रजी कथाकथन स्पर्धा-8275777617, 7798034403,५) हिंदी वक्तृत्व स्पर्धा-9420208552, 9422782550, ६) संस्कृत कथाकथन स्पर्धा-7218716757, 8806570861, ७) निबंध लेखन स्पर्धा-9923975631, 9420821325, 8) शिक्षक स्पर्धा (प्रार्थना गायन),9423301904, 9421070337

या ऑनलाइन स्पर्धेत उत्स्फूर्त पणे सहभाग घ्यावा असे आवाहन संस्था अध्यक्ष शैलेश पई, सचिव प्रसाद नार्वेकर सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक (प्राथ.माध्य.),सर्व शिक्षक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page