सावंतवाडी /-
दानाचे अनेक प्रकार आहेत मात्र रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. कोरोनाच्या महामारित या दानाला अनन्य साधारण महत्त्व आहे. मात्र कोरोनामुळे संपूर्ण देशातच रक्तदानाचा तुटवडा जाणवत आहे अशा परिस्थितीत धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेले हे रक्तदान शिबिर अनेकांना जीवदान देऊ शकेल असा आशावाद येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरात ६४ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे अवचित्त साधून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात डॉ पाटील हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर हे होते. यावेळी रक्त संक्रमण अधिकारी डॉ एस एम बागवान वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप सावंत यांच्यासह जिल्हा महिला आघाडी प्रमुख भावना कदम, युवक आघाडी प्रमुख तेजस पडवळ, मिलिंद नेमळेकर, आर. जी. चौकेकर, एम. बी. कदम, आनंद जाधव, मोहन साटेलकर, परेश जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी डॉ संदीप सावंत यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालण्यात आला. तर करक्रमाचे उद्घाटन डॉ पाटील यांच्याहस्ते प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष परुळेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून रक्तदान शिबिराच्या उद्देश स्पष्ट केला व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या महत्त्व स्पष्ट केले या शिबिराला मिळालेल्या उस्पूर्त प्रतिसादांबद्दल आयोजक प्रदीप कांबळे, वासुदेव जाधव यांनी सर्व रक्त दात्यांचे आभार मानले. या कार्यक्रमात तालुक्यातील वंचित चे कार्यकर्ते व बौध्द बांधव उपस्थित होते.
फोटोवळ
१ डॉ उत्तम पाटील फोटोपुजन करताना
२ आयोजक वासुदेव जाधव व तिसऱ्या फोटोत प्रदीप कांबळे रक्तदान करताना.