नवी दिल्ली /-
विजयादशमी म्हणजेच दसऱ्या निमित्त देशवासीयींना शुभेच्छा देत पंतप्रधान मोदींनी आजच्या मन की बात कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. विजयादशमीचे पर्व हे असत्यावर सत्याच्या विजयाचे व एकप्रकारे संकटावर धैर्याच्या विजयाचे देखील पर्व असल्याचे त्यांनी सुरूवातीस सांगितले. तसेच, सण-उत्सवांच्या काळात बाजारात खरेदीसाठी जाताना व्होकल फॉर लोकलचा आपला संकल्प नक्कीच लक्षात ठेवा, असं त्यांनी देशवासीयांना आवाहन केलं आहे.
मोदी म्हणाले, ”जेव्हा आपण सण, उत्सवांबद्दल बोलतो, तयारी करतो. तेव्हा सर्वात अगोदर मनात हेच येतं की, बाजारत कधी जायचं काय? खरेदी करायची. विशेषता मुलांमध्या याबद्दल मोठा उत्साह असतो. सणांचे हा उत्साह व बाजारातील चमक एकमेकांशी जुडलेली आहे. मात्र यंदा तुम्ही जेव्हा खरेदीसाठी जाल, तेव्हा व्होकल फॉर लोकलचा आपला संकल्प नक्कीच लक्षात ठेवा. बाजारातून सामान खरेदी करताना, आपल्याला स्थानिक उत्पादनांना प्राथमिकता द्यायची आहे.”