कोरोनाचा प्रसार अद्यापि थांबलेला नाही. दररोज हजारो नवीन रुग्ण आढळून येत आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे शरीरावर होणारे दुष्परिणामही समोर येत आहेत.
एक प्रकार कर्नाटकात रुग्णाच्या शरीरात आढळला आहे. कोरोनामुळे मृत पावलेल्या या रुग्णाचं फुफ्फुस लेदर बॉलसारखं टणक झाल्याचं शवविच्छेदन करताना आढळलं.
कोरोना विषाणू माणसाच्या शरीरात जाऊन त्याच्या फुफ्फुसावर हल्ला करतात. यात अनेक रुग्णांचा मृत्यू होतो.
कोरोना विषाणुमुळे रुग्णाच्या फुफ्फुसाची किती भयंकर अवस्था होते, हे कर्नाटकातील रुग्णाच्या शवविच्छेदनानंतर दिसलं आहे.
६२ वर्षांच्या एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या रुग्णाचा मृत्यू फुफ्फुसाची विचित्र अवस्था झाल्यानंच रुग्णाचा बळी गेल्याचं आढळून आलं.
धक्कादायक बाब म्हणजे रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर १८ तासांनंतरही त्याच्या नाक व घशात कोरोनाचे जिवंत विषाणू आढळले.