“त्या” गावातील खाणीची चौकशी करून कारवाई करा..

“त्या” गावातील खाणीची चौकशी करून कारवाई करा..

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी..

सावंतवाडी /-

सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये, सोनुर्ली, इन्सुली या गावामध्ये काळ्या दगडाच्या खाणी व क्रशर आणि हॉटमिक्स प्लॅट बसविण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु परवानगी दिलेल्या पेक्षा जास्त उत्खनन केले गेले असल्याने त्याचा परिणाम तेथील रहिवाशांच्या घराना तडे गेले आहेत.

तर काही ठिकाणी पाण्याचे प्रवाह बदलले असल्याने पाणी टंचाई काही गावात निर्माण होत आहे. त्यामुळे या गावातील क्रेशर ची योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा याबाबत न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचा इशारा देखील त्यानी यावेळी दिला आहे.

अभिप्राय द्या..