मालवण /-
राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाची अमंलबजावणी शैक्षणिक वर्ष फेब्रुवारी मार्च २०२०-२१ पासून करण्यात आली आहे. सदर नवीन अभ्यासक्रमाची इयत्ता बारावीची प्रथम परीक्षा पुढील वर्षी (२०२१) घेण्यात येणार आहे. पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार इयत्ता बारावी भाषा विषयासाठी कृतीपत्रिक/ प्रश्नपत्रिकांची अंमलबजावणी करण्यात आल्याने इंग्रजी विषयासाठी यापूर्वीच्या बहुसंचि प्रश्नपत्रिका (ऐ, बी, सी, डी चार संच) योजनेत बदल करून २०२१ मध्ये होणाऱ्या बारावी परिक्षेपासून इंग्रजी विषयासाठी सर्व विद्यार्थ्याना एकच प्रश्नपत्रिका सोडवावी लागणार आहे. सन २०२०-२१ मध्ये परीक्षा देणाऱ्या पुनरपरिक्षार्थी ( रिपीटर) विद्यार्थ्यांसाठी प्रचलित पद्धतीने मात्र चार संचाची प्रश्नपत्रिका राहणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळ कोकण विभागीय मंडळाचे विभागीय सचिव डी. बी. कुलाल यांनी दिली आहे.
बहुसंचि प्रश्नपत्रिका योजना ऑक्टोबर २००४ च्या परिक्षे पासून सुरू करण्यात आली होती. शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून इयत्ता अकरावी साठी तर २०२०-२१ पासून इयत्ता बारावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाची निर्मिती आणि त्या आधारे नवीन पुस्तकांची निर्मिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व महा. राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांचे मार्फत करण्यात आली आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार बारावीच्या इंग्रजी विषयासाठी बहुसंचि प्रश्नसंच ऐवजी सर्व विद्यार्थ्यांना एकच प्रश्नपत्रिका सोडवावी लागणार असल्याने या विषयाची भीती दूर होण्यास मदत होणार असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमधून येत आहेत.