..अखेर एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश.;राष्ट्रवादी प्रवेशानंतर काय म्हणाले खडसे?

..अखेर एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश.;राष्ट्रवादी प्रवेशानंतर काय म्हणाले खडसे?

मुंबई /-

मी गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारण करतो आहे. मात्र कधीही कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. तोंडावर गोड बोलायचं, तुम्ही ज्येष्ठ म्हणायचं आणि मागून खंजीर खुपसायचा हे मी कधीही केलं नाही. ४० वर्षे मी भाजपाची सेवा केली, त्याबदल्यात मला काय दिलं पक्षाने? माझ्यावर झालेल्या अन्यायाचं उत्तर भाजपाचे लोक देऊ शकले नाही. मी पक्ष सोडावा अशी कार्यकर्त्यांची भावना होती. तोंडावर गोड बोलायचं आणि पाठीमागे कारवाया करत रहायचं हे मी कधी केलं नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी टोला लगावला आहे.

मी राष्ट्रवादीत जाणार तर बोंबाबोंब झाली. मग तुम्ही सकाळी पाच वाजता शपथ घेतली तेव्हा तुम्हाला राष्ट्रवादी पक्षच चांगला वाटला ना? पहाटे पाचला जसा तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगला वाटला होता त्यापेक्षा मला राष्ट्रवादी पक्ष चांगला वाटतो आहे ना.. म्हणून मी आलो राष्ट्रवादीत असं म्हणत पहाटेच्या शपथविधीवरही खडसेंनी टीका केली. आज राष्ट्रवादीत आल्याने मला माझ्या डोक्यावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं आहे असंही खडसे यांनी म्हटलं आहे.

अभिप्राय द्या..