रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते असा प्रश्न समोर असताना गतिरोधकांची आवश्यकता नाही
दोडामार्ग /-
दोडामार्ग तालुक्यातील रस्त्यांची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली असुन दोडामार्ग तालुका हा खरच एक दुर्गम क्षेत्र आहे ही ओळख पटवून देताना दिसत आहे. त्यातच दोडामार्ग ते विजघर हा मुख्य रस्ता तर दुर्घटनेस आमंत्रण देताना दिसत आहे रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते हे समजन तर फारच कठीण झाल असून आता तर प्रत्येक ठीक-ठिकाणी पाण्याने साचलेली डबकी निर्माण झालेली आहेत आणि रस्त्यातील हे खड्डे झाडे लावण्या व्यतिरिक्त दुसरे काहीच उपयोगाचे दिसत नसून यातून भलामोठा अपघात होण्याची मात्र दाट शक्यता आहे व शासन या अपघाताची वाट बघतय काय असा प्रश्न दोडामार्ग वासीयांना पडला आहे.
दोडामार्ग व विजघर हा मुख्य रस्ता कर्नाटक व गोवा अशा दोन्ही राज्यांना जोडणार रस्ता असून यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते व वाहतूक प्रचंड प्रमाणात होत असल्याने ठीक-ठिकाणी गतिरोधक घालण्यात आले असून या गतिरोधकांचा काडी मात्र उपयोग नसल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे कारण खड्डेमय रस्ते असल्याने वाहन चालकांना वाहनांची गती वाढणे शक्यच नसून खड्डेमय रस्त्यांचा त्रास सहन करणारे दोडामार्ग मधील नागरिक गतिरोधक काढा आणि त्याच माला पासून खड्डे बुजवा असा संदेश सोशल मिडियाद्वारे देत आहेत सद्याचा काळ हा बेरोजगारी वाढवणार काळ असून यातच ह्या रस्त्याची दुरवस्था झालेली असून नुकताच चालू झालेल्या गोवा राज्यात दोडामार्ग मधील युवा पिढी कामा निमित्त गोवा राज्यातून येजा करत असून रस्त्यामुळे या युवकांना इंधनासह गाडीचा दुरुस्ती खर्च देखील खूप मोठया प्रमाणात येत असून युवा पीडी देखील त्रस्त झालेली आहे .
दोडामार्ग ते विजघर बांदा ते दोडामार्ग असे दोन्ही मुख्य रस्ते खराब झाल्याने येथील लोकांना कंबर दुःखी सारख्या अन्य आजारांना सामोरे जावे लागत आहे तसेच गाडीला ही अवाढव्य खर्च येत असून येथील लोकांना मानधन हे खूप कमी स्वरूपात असल्याने सर्व मानधन गाडी वर खर्च होत असून आपली नोकरी ठिकवण्यासाठी खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे पण शासनाने यावर कोणत्याही पद्धतीची दखल घेतली नसून दोडामार्ग वासीयांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे तसेच हा रस्ता मृत्यूचा सापळा बनल्याने वयोवृद्ध व्यक्तींना गाडीवर बसवणे देखील कठीण झाले असून लोकडाऊन काळात या व्यतिरिक्त दुसरा पर्याय देखील राहिला नसल्याने गाडीवर बसवावे लागत आहे सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी देखील येते झाली नसल्याने शासन जीवित हानी होण्याची वाट पाहताय की काय असा प्रश्न देखील दोडामार्ग वासीयांच्या मनात उपस्थित झाला आहे.