मुंबई /-
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेश करण्याचा निर्णय घेत भाजपाला मोठा धक्का दिला आहे. खडसेच्या यांच्या पक्ष प्रवेशाची माहिती देताना आणखी काही नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.त्यामुळे राज्याच्या राजकारणात भाजपाला गळती लागणार असल्याची चर्चा होत आहे. अशात भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना शिवसेनेकडून ऑफर देण्यात आली आहे.