कुडाळ / –

भारतीय जनता पार्टीच्या वतीने कुडाळ तालुक्यात प्रत्येक विभागातील प्रत्येक गावात भेट देऊन शेतकऱ्यांची चर्चा करण्याच्या निमित्ताने गावभेट दौऱ्याचा शुभारंभ आज घावनळे मतदारसंघात करण्यात आला. यावेळी घावनळे जि प मतदार संघातील सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या आंजिवडे गावापासून या दौऱ्याचा शुभारंभ करण्यात आला..

आंजिवडे, शिवापुर, वसोली, उपवडे, हळदिचे नेरुर / चाफेली, केरवडे, पुळास, गोठोस, निळेली, वाडोस, मोरे, कांदुळी, कालेली, आंबेरी आणि घावनळे या गावातील ग्रामस्थांनी या गावभेट कार्यक्रमात उस्फूर्त सहभाग घेऊन विविध मागण्यांसाठी निवेदने दिली.

यावेळी शेतकऱ्यांनी नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त झालेल्या शेतीची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी आणि योग्यरीतीने मिळावी त्याचप्रमाणे या मतदारसंघातील नद्यांवरील साकव, पूल ,रस्ते दुरुस्तीची कामे त्याच प्रमाणे या भागात नेहमीच भेडसावणारी मोबाईल टॉवरची समस्या तसेच अन्य विकास कामे यासाठी निवेदने दिली आहेत. या सर्व गोष्टींचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने पाठपुरावा करून या मतदारसंघातील कामे प्राधान्याने करण्याबाबत ग्रामस्थांना आश्वस्त केले आहे.
यावेळी शेती नुकसान भरपाई संदर्भात बोलताना शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी याकरिता गावस्तरीय कर्मचारी व यंत्रणांना वेळेत काम करण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषिअधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याचे आश्वासन श्री. रणजीत देसाई यांनी दिले.
या दरम्यान ज्यांच्यावर शेती नुकसानीच्या पंचनाम्याची जबाबदारी आहे अश्या काही तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांचीही भेट घेण्यात आली. त्याचप्रमाणे या विभागातील मोबाईल नेटवर्क संदर्भात येत्या आठ दिवसांमध्ये जिओ कंपनीच्या वतीने या मतदारसंघात सर्वे करून लवकरात लवकर टॉवर उभारण्या संदर्भात कार्यवाही पूर्ण करण्यात येईल असे देखील यावेळी त्यांनी सांगितले..

यावेळी जिल्हा परिषद गटनेते श्री रणजीत देसाई, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ, चारुदत्त देसाई, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, जिल्हा कार्यकारणी सदस्य मोहन सावंत, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोरये, दादा बेळणेकर, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, युवामोर्चा जिल्हा प्रवक्ता दादा साईल, तालुका उपाध्यक्ष राजा धुरी, तालुका सरचिटणीस विजय कांबळी, देवेंद्र सामंत, योगेश बेळणेकर, युवामोर्चा तालुकाध्यक्ष पप्या तवटे, घावनळे विभागीय अध्यक्ष दिनेश शिंदे, कृष्णा पंधारे, भगवान राऊळ, संदीप म्हाडगूत, बाबल म्हाडगूत, सत्यवान म्हाडगूत, संजय देसाई, राजन गुरव, सुरेश धुमक इत्यादी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page