ब्युरो न्यूज /-

▪️कोरोनामुळे देशाला बसलेल्या आर्थिक फटक्याच्या पार्श्वभूमीवर सामर्थ्यशाली देशांच्या यादीमधून भारत बाहेर टाकला आहे. भारत हा आशियामधील चौथा सर्वात शक्तीशाली देश ठरला आहे.

*जाहीर* : सिडनीमधील लोवी इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यासामध्ये आशियामधील सर्वात प्रभावशाली देशांची यादी जाहीर केली आहे.

*चौथा* : आशिया पॉवर इंडेक्स फॉर २०२० हा अहवाल सादर झाला असून आशिया पॅसिफिक प्रदेशामध्ये भारत हा अमेरिका, चीन आणि जपाननंतर चौथा सर्वात प्रभावशाली देश ठरला आहे.

*मेजर पॉवर* : सर्वात सामर्थ्यशाली म्हणजेच मेजर पॉवर हा दर्जा भारताने गमावला आहे. ४० हून अधिक गुण असणाऱ्या देशांना प्रभावशाली देशांच्या यादीत स्थान दिलं जातं.

*गुण* : मागील वर्षी भारताला ४१ गुण होते तर यंदा यामध्ये १.३ ची घट झाली असून भारताला २०२० मध्ये ३९.७ गुण मिळाले आहेत.

▪️आशिया पॅसिफिकमध्ये कोरोनामुळे सरासार परिस्थिती खालावत चाललेल्या १८ देशांमध्ये भारताचा समावेश आहे.

*मोठा ताण* : कोरोनामुळे देशाच्या आरोग्य आणि आर्थिक परिस्थितीवर मोठा ताण पडला असून यामुळेच भारताचा विकास मंदावला आहे असं लोवी इन्स्टिट्यूटने आपल्या अहवालात म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page