दहा मुलींना दिला लाभ बॅरिस्टर नाथ पै सेवांगण शाखेचा पुढाकार..

मालवण /-

रोटरी क्लब, मुंबई माहिमच्या वतीने मालवण तालुक्यातील कट्टा सेवांगण येथे बॅ . नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या सहकार्याने कट्टा परिसरातील १० गरीब मुलीना सायकल वितरण करण्यात आले.
प्रास्ताविक करताना किशोर शिरोडकर यानी
रोटरी क्लब मुंबई माहिम गेली दोन वर्ष कट्टा परिसरात विविध सेवा सुविधा पुरवीत असल्याचा उल्लेख केला.सौ. हि. भा. वरसकर विद्यामंदिर वराड येथे सॅनिटरी पॅड वेडिंग मशिन, तसेच न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर, केंद्रशाळा कट्टा नं १, भ.ता. चव्हाण म. मा विद्यालय चौके, व वराड हायस्कूल या ४ शाळाना २ लाख रूपये किंमतीची पुस्तके व कपाटे दिली, असे सांगितले. तसेच गेल्या २ वर्षात २o गरीब मुलीना सायकलचे वितरण करण्यात आले. ज्या मुलीना ३ कि मी पेक्षा जास्त अंतर शाळेत जाताना चालाव लागतं अशा गरीब शेतकरी कुटंबातील मुलींची निवड करण्यात आली आहे, याचा आवर्जून उल्लेख केला
वराड हायस्कूलचे मुख्याध्यापक टी.के. पाटील यानी वराड हायस्कूलच्या वतीने रोटरी क्लबचे आभार मानले. या पुढेही रोटरी क्लब साहाय्य करेल अशी अपेक्षा व्यक्त केली. रोटरी क्लबच्या माजी अध्यक्षा संध्या समुद्र यानी रोटरी क्लब मुंबई माहिमच्या कार्याचा आढावा घेतला. बॅ नाथ पै सेवांगणच्या सहकार्याबद्दल धन्यवाद देऊन यापुढेही रोटरी क्लब माहिम संयुक्तरित्या अनेक उपक्रम राबवेल याची ग्वाही दिली. दीपक भोगटे यानी बॅ नाथ पै सेवांगणाच्या उपक्रमांची माहिती दिली. लाभार्थी मुलीनी सायकलचा उपयोग गुणवत्ता वाढीसाठी करावा असे मुलीना आवाहन केले .या अनुषंगाने नीट परीक्षेत उज्ज्वल यश मिळवाऱ्या जान्हवी लाड हिचे कौतुक केले.
मान्यवरांचे हस्ते १० गरीब मुलाना सायकलचे वितरण करण्यात आले. यावेळी संपदा भाट, जाधव गुरुजी,जान्हवी लाड, वैष्णवी लाड, भक्ती पाटील यानी मनोगत व्यक्त केली. झूम अॅपवर झालेल्या कार्यक्रमात रोटरी क्लब माहीमच्या अध्यक्षा उषा यज्ञशेषन, माजी अध्यक्षा संध्या समुद्र, वंदना राजहंस, रश्मी पाटील, किशोर शिरोडकर, दीपक भोगटे, टी. के पाटील, शाम पावसकर, शाम माळवदे, बाळ नांदोस्कूर, गंगाराम गावडे, डॉ गोपाळ सावंत
सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page