आता चंद्रावरही मिळणार मोबाईल नेटवर्क…

▪️चंद्रावर पहिले सेल्युलर नेटवर्क उभे करण्यासाठी अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने फिनलंडची कंपनी नोकियाची निवड केली आहे.

*योजना* : नासा भविष्यातील वसाहतीच्या दृष्टीने चंद्रावर सेल्युलर नेटवर्क प्रस्थापित करण्याची योजना आखत असून चंद्रावर मानवी वस्ती उभी करण्याच्या प्रयत्नात आहे.

*आर्मेटीस प्रोग्राम* : २०२४ मध्ये माणसांना चंद्रावर नेण्याचे लक्ष्य नासाने आखले आहे. या योजनेला आर्मेटीस प्रोग्राम असे नाव दिले गेले आहे.

*प्रयत्न* : नोकियाकडून या संदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार नासा चंद्रावर माणसाना दीर्घकाळ वास्तव्य करता आले पाहिजे या दृष्टीने प्रयत्नशील आहे.

*सिस्टीम* : नोकिया अंतराळात पहिली वायरलेस ब्रॉडबँड कम्युनिकेशन सिस्टीम २०२० अखेरीपर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर सुरु करणार आहे.

*करार* : टेक्सासच्या खासगी स्पेस क्राफ्ट डिझाईन कंपनी इन्टूएटीव्ह मशीन्स बरोबर करार करण्यात आला आहे.

*खुलासा* : या कंपनीच्या सहकार्याने नोकिया त्यांची उपकरणे चंद्रावर नेणार आहे. तेथे ४ जी/ एलटीई कम्युनिकेशन स्थापन केले जाणार आहे. मात्र अंतिम लक्ष्य ५ जी नेटवर्कचे आहे असा खुलासा केला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page