मुंबई /-

खासदार विनायक राऊत यांचा मंत्रालयात दोडामार्ग आडाळी येथील प्रकल्प ईतर ठिकाणी हलवण्यास विरोध.कायम दर्शवला आहे.मौजे आडाळी, तालुका दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग येथे National Institute of Medicinal Plant (NIMP) प्रकल्प राबविण्याबाबत महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री मा.ना.श्री. राजेंद्र श्यामगौडा पाटील यड्रावकर साहेब यांच्या उपस्थितीत आज मंत्रालय येथे बैठक पार पडली.बैठकीमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार, लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव मा.श्री.विनायक राऊत साहेब यांनी National Institute of Medicinal Plant (NIMP) प्रकल्प मौजे आडाळी, तालुका दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग येथेच राबविण्यात यावा अशी आग्रही मागणी केली आहे.

मा राज्यमंत्री यांनी देखील सदर मागणीला दुजोरा देत मौजे आडाळी येथेच प्रकल्प राबविण्याबाबत संबंधित अधिकारी यांना तात्काळ आवश्यक तो प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे तातडीने पाठविण्यात यावा, असे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page