आणखी ४ महिने पावसाचं संकट कायम..

आणखी ४ महिने पावसाचं संकट कायम..

मुंबई /-

राज्यात आणि देशात धुमाकूळ घालणारा पाऊस शांत होण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. फक्त भारतातच नाही तर दक्षिण आशियावर आलेलं पावसाचं संकट आणखी किमान ४ महिने कायम राहणार असल्याचा दावा ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ आणि दक्षिण आशिया कृषी हवामान फोरमचे सदस्य डॉ. रामचंद्र साबळे यांनी केला आहे.साबळे म्हणाले, पुढचे ४ महिने दक्षिण आशियात पाऊस धुमशान घालू शकतो. ऑगस्टपासून दक्षिण आशियावर ला निनाचा प्रभाव आहे. ला निना म्हणजे सतत पावसाला पोषक वातावरण होणं. सध्या महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्र प्रदेशात पडत असलेला पाऊस त्याचाच परिणाम आहे.

अभिप्राय द्या..