ब्युरो न्यूज /-

▪️जगभरात आणि भारतात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएलच्या १३ व्या हंगामाचं आयोजन युएईत केलं आहे. करोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी मैदानात प्रेक्षकांना हजर राहण्याची परवानगी नाकारण्यात आलेली आहे. पण क्रिकेटचे सामने आणि ते देखील प्रेक्षकांविना?? हे समीकरणं कसं बरं जुळवायचं?? यासाठी उपाय काढण्यात आला तो म्हणजे प्रेक्षकांचे रेकॉर्डेड आवाज, टाळ्या-शिट्ट्या…चिअरलिडर्सच्या रेकॉर्डेड डान्स मूव्ह्ज यांचा… आयपीएलच्या सामन्या दरम्यान असणारे प्रेक्षकांचे रेकॉर्डेड आवाज, टाळ्या-शिट्ट्या या मुंबईच्या स्टुडिओमध्ये तयार करण्यात आले आहेत. मुंबईच्या स्टुडिओमध्ये इंजिनिअरने तयार केलेल्या ‘साउंड बँक’ मुळे आपल्याला सामना पाहाताना प्रेक्षकांचे आवाज, टाळ्या-शिट्ट्या ऐकू येतात. यासाठी आयपीएल ब्रॉडकॉस्ट स्टार इंडियानं आयपीएलपूर्वीच तीन महिने तयारी केली आहे. वानखेडे, चिन्नस्वॉमी आणि चेपॉकसारख्या भारतातील मैदानावरील आवाजाचं मिक्सिंग तयार करण्यात आलं आहे.

▪️स्टार इंडियाचे क्रीडा प्रमुख संजोग गुप्ता यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलेय की, ‘आयपीएल सुरु होण्यापूर्वी २०१८ पासून झालेल्या आयपीएलच्या १०० सामन्याचा अभ्यास केला. प्रत्येक सामन्यासाठी आणि खेळाडूसाठी आवाजाचा (साउंड) अभ्यास करण्यात आला. जसं की, चेन्नई आणि मुंबई यांच्या सामन्यातील आवाजाचा डेसीबल पंजाब आणि दिल्लीच्या सामन्यापेक्षा खूप वेगळा असेल. ‘

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page