भाजपच्या सहकार सेल ग्रामीण मंडलच्या अध्यक्षपदी समीर रमाकांत सावंत यांची निवड..

भाजपच्या सहकार सेल ग्रामीण मंडलच्या अध्यक्षपदी समीर रमाकांत सावंत यांची निवड..

कणकवली /-

कणकवली – भाजपच्या सहकार सेल कणकवली तालुका ग्रामीण मंडलच्या अध्यक्षपदी समीर रमाकांत सावंत यांची निवड करण्यात आली आहे. य निवडीबद्दल त्यांचे भाजपा आमदार नितेश राणे आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पुषपगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. तसेच पुढील वाटचालीला शुभेच्छाही दिल्या.

समीर रमाकांत सावंत हे सहकार चळवळीतील तरुण कार्यकर्ते आहेत. कायद्याचे पदवीधर असलेले समीर सावंत याना त्यांचे वडील, वागदे गावाचे माजी सरपंच आणि कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष कै. रमाकांत सावंत यांच्याकडून सामाजिक कार्याचा वारसा लाभला आहे. श्री उभादेव सामाजिक युवक मंडळ वागदेच्या माध्यमातून समीर सावंत यांनी सामाजिक कामाची मुहूर्तमेढ रोवली आहे. तसेच रमाकांत सावंत चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विविध समाजपयोगी उपक्रम ते राबवत असतात.

या नव्या जबाबदारीत त्यांच्यावर कळसुली, बिडवाडी, खारेपाटण कलमठ या चार जिल्हापरिषद मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबत समीर सावंत यांनीं भाजपा नेते खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे आभार मानले आहेत.

अभिप्राय द्या..