वेंगुर्ला /-

येथे श्री देवी सातेरी शेतकरी गटाने पूर्व प्रा. शाळा आडेली न. १ चा परिसर श्रमदान संकल्पना राबवून इतर शाळा समोर स्वच्छतेचा महामंत्र आदर्श म्हणून ठेवला आहे.कोरोणा विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्याने या वर्षीच्या शाळा परिसर स्वच्छतेला अनन्य साधारण महत्व आहे.दर वर्षी मुलांच्या सोबत काही नजिकचे पालक पावसाळ्यानंतर शाळा परिसर स्वच्छतेला हातभार लावतात.मात्र या वर्षी मुले तर शाळेत नाहीतच शिवाय बऱ्याच शाळा क्वारण टाई न केंद्र म्हणून वापरल्या गेल्याने पालक अशा ठिकाणी स्वच्छतेला जाण्यास नाक मुरड ने साहजिकच आहे.

मात्र हे सर्व पाश बाजूला फेकत श्री देवी सातेरी शेतकरी गट पुढे सरसावला. त्यांनी तब्बल चार ग्रास कट्टर यंत्राचा वापर करून हा हा म्हणता शाळा परिसर स्वच्छ करून टाकला. गेल्या सहा महिन्यात शाळा परिसरात कोणीच न फिरकल्याने गवत , वेली व झुडपानी विळखा घातला होता.शेतकरी गटाच्या तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर शाळा परिसराने जुनी कात टाकून नवीन वस्त्रालंकार प्राप्त केल्याचा साक्षात्कार जाणवत आहे.या कामी आप्पा ठाकूर , विनू ठाकूर, मंगेश धुरी, दयानंद धर्णे, बाबल धरणे, संतोष धरणे, विश्राम परब, संदीप धुरी, विनय धरणे, ओंकार धरणे, सुभाष धरणे, बाब्ब्या धुरी, उत्तम आगलावे, निखिल धरणे, महादेव परब, तात्या कोंडस कर ,पदवीधर शिक्षक भिवा सावंत,तसेच इतर शिक्षकांचे अनमोल सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page