नवी दिल्ली /-
देशात कोरोनारुग्ण बरे होण्याचा प्रमाण वाढत असून, ही एक दिलासादायक बाब आहे. देशात गेल्या 24 तासात 62 हजार 212 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे.
त्यामुळे देशातील कोरोना ग्रस्तांचा आकडा हा 74 लाख 32 हजार 681 एवढा झाला आहे. सध्या देशातील विविध भागात 7 लाख 95 हजार 87 जणांवर उपचार सुरू आहे.
तर उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 लाख 12 हजार 998 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत सुमारे 65 लाख 24 हजार 596 जणांनी कोरोनामुक्त झाले आहे.