कुडाळ तालुक्यात आज शनिवारी दिवसभरात एवढे कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ तालुक्यात आज शनिवारी दिवसभरात एवढे कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज शनिवारी दिवसभरात कोरोना रुग्ण ०५ आढळून आले असून कुडाळ शहरात मात्र एकही रुग्ण आढळून आला नाही.कुडाळ तालुक्यात आज शनिवारी ५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आहेत. यामध्ये पाट १, ओरोस ३, माणगांव भटवाडी १ असे रूग्ण आढळून आले असून तालुक्यात ४३९ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ३७६ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ६३ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकुण रुग्ण १०४१ तर बरे झालेले रुग्ण ९०७ आणि सक्रिय रुग्ण १०३ आहेत. आतापर्यंत तालुक्यात ३१ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

अभिप्राय द्या..