मालवण/-
मालवण येथील “मातृत्व आधार फाऊंडेशनच्या वतीने नीट परीक्षेत महाराष्ट्रात पहिला आणि भारतात एकोणीसवा आलेल्या कु. आशिष अविनाश झाटये आणि देशात १४८८ क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या पराड येथील कु.जान्हवी विष्णू लाड या मालवण तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या नावाबरोबर मालवणच, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तसेच महाराष्ट्र राज्याचे नाव भारतदेशाच्या नकाशावर उमटविले याची दखल घेऊन संस्थेच्या वतीने या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले
यावेळी आशिषचे वडील डॉ. अविनाश झाटये, आई डॉ. शिल्पा झांटये, जान्हवीचे वडील श्री. विष्णू लाड, आई सौं. लाड तसेच संस्थेच्या वतीने अध्यक्ष श्री. आप्पा चव्हाण, संचालक श्री. संतोष लुडबे, पत्रकार प्रफुल्ल देसाई, तपस्वी मयेकर, विश्वास गांवकर, प्रसाद भोजने, संतोष नाटेकर, सौ. श्वेतांगी मणचेकर, पंकज पेडणेकर, सुर्यकांत फणसेकर, राजा शंकरदास, संजय नरे, तपस्वी मयेकर, महादेव उर्फ भाई गांवकर, मयेश कारेकर, अवि पाटकर, संदीप नेवाळकर, दीपक कुडाळकर नितीन मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दोन्ही गुणवंत विद्यार्थीना उपस्थित सर्व मान्यवरांकडून भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन यापुढे स्वतःचे व मालवणचे नाव पुढे नेण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.