अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचा उपक्रम
वेंगुर्ला/-
वेंगुर्ले तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ वेंगुर्ले ही शिक्षक संघटना विविध उपक्रमांचे आयोजन करत असते. १५ आॅक्टोबर वाचन प्रेरणादिन तथा डाॅ. ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती निमित्त अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने आयोजित केलेल्या डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्यावर आधारीत प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकाल वेंगुर्ला गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी व शिक्षण विस्तार अधिकारी वंदना परब यांचे शुभहस्ते जाहीर करण्यात आला.
*प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी*
1. सोहम संतिश गावडे. मठ नं.1
2. सान्वी गुरुनाथ गावडे. वेतोरे नं.1
3. मंदार बापू नाईक. जैतीर विद्या. तुळस
4. तन्वी धनंजय गुंजाळ. परुळे नं.1
5. कर्तव्य तेजस बांदिवडेकर. वजराठ नं.1
6. भाविका विनायक आईर. मठ कणकेवाडी
7. चिराग नारायण बघेल. वेंगुर्ले नं.3
8. वैभवी दिनकर परुळेकर. परुले नं.3
9. माही राजाराम घोंगे. आडेली भंडार वाडी
10. नरेश मंगेश कांबळी . उभादांडा नं.1
*शिक्षक प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रावीण्यप्राप्त शिक्षक*
1. तुषार बाळकृष्ण दळवी. कोचरे प्रताप पंडीत
2. भिवा केशव सावंत. आडेली नं.1
3. प्रेमदास रामू राठोड. शिरोडा नं.1
4. सुनंदा विठ्ठल तिवरेकर. शिरोडा नं.1
5. तेजश्री मनोहर जावळे. आसोली सक्राळ.
शिक्षक व विद्यार्थी अशा दोन गटात आॅनलाईन घेण्यात आलेल्या या स्पर्धेत तालुक्यातून 193 विद्यार्थी तसेच 137 शिक्षकांनी ऊत्स्फुर्त सहभाग घेतला. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी व शिक्षक तसेच आयोजकांचे गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी शिक्षण विस्तार अधिकारी वंदना परब, शोभराज शेर्लेकर, तालुक्यातील शिक्षक, यांनी अभिनंदन केले आहे. उपक्रम यशस्वी करण्यासाठी समीर चव्हाण यांनी विशेष मेहनत घेतली. स्पर्धेत उत्सफुर्तपणे सहभागी होऊन उपक्रम यशस्वी केल्याबद्दल तालुकाध्यक्ष एकनाथ जानकर सरचिटणीस सागर कानजी तसेच सर्व पदाधिकारी यांनी आभार व्यक्त केले आहेत.