वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने शनिवार १७ ऑक्टोबर ते रविवार २५ ऑक्टोबर या कालावधीत वेंगुर्ला तालुका शिवसेना कार्यालय वेंगुर्ला या ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे सांस्कृतिक कार्यक्रम निर्बंध असल्यामुळे नवरात्रोत्सव अत्यंत साधेपणाने धार्मिक भावनेने व भक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या उत्सवाला उपस्थित राहून श्री दुर्गा मातेच्या दर्शनाचा व विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नवरात्रोत्सव कमिटी अध्यक्ष अस्मिता राऊळ व उपाध्यक्ष मंजुषा आरोलकर यानी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page