रत्नागिरी /-

रत्नागिरी जिल्हा देशी मद्य विक्रेता संघाच्या वतीने कोव्हिड – १९ च्या वैश्विक महामारीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी १५००००/-( एक लाख पन्नास हजार ) उपजिल्हाधिकारी श्री दत्ता भडकवाड साहेब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

लॉकडाउअन सुरु झाल्यापासून देशी / विदेशी / माडी परवानाधारकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे . शासनाच्या सर्व अटी ,नियम पाळत स्वतः सह कर्मचारी आणि गिर्हाईकांची योग्यती काळजी घेत , सोशल डिस्टंसीन मास्क सॅनिटायझर सक्ती करुन व्यवसाय सुरु ठेवण्यात आला होता परंतु जिल्ह्यातील एकाही परवानाधारक अथवा कर्माचारी कोरोनाने बाधित झाला नाही.अश्याप्रकारची महामारी कोणीही यापूर्वी अनुभवलेली नव्हती , सरकार आपापल्या पद्धतीने कोरोनाचा लढा देत आहे परंतु व्यवसायिकांनी स्वतःचे कर्तव्य समजुन संघाच्या वतीने ही रक्कम रत्नागिरी जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक श्री तडवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मा . जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी रत्नागिरी जिल्हा देशी मद्य विक्रेता संघाचे अध्यक्ष श्री राजीव कीर , श्री विजय कदम , श्री रविंद्र सुर्वे , श्री सुनीलशेठ दाभोळकर , श्री महेश घोसाळकर , दर्शन उर्फ बाबु पाटील, सागरशेठ सुर्वे , बाळाशेठ मयेकर ,प्रकाश लब्धे , सुहास भोसले, कडवईचे श्री रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page