कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी कोरोना रुग्ण 07आढळून आले असून कुडाळ शहरात ३ रुग्ण आढळून आले आहेत.कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी ७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आहेत. यामध्ये कुडाळ ३, झाराप १, नेरूर कर्याद नारूर १, कुटगांव २ असे रूग्ण आढळून आले असून तालुक्यात ४३० एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ३७५ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ५५ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकुण रुग्ण १०३६ तर बरे झालेले रुग्ण ८९४ आणि सक्रिय रुग्ण ११२ आहेत. आतापर्यंत तालुक्यात ३० रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page