चंद्रकांत सावंत यांनी घेतली ८२ वी विद्यार्थिनी दत्तक..

चंद्रकांत सावंत यांनी घेतली ८२ वी विद्यार्थिनी दत्तक..

वेंगुर्ला/-

वेंगुर्ला तालुक्यातील मठ शाळा नं.२ चे विविध पुरस्कारप्राप्त शिक्षक चंद्रकांत सावंत यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा – वेंगुर्ला वडखोल येथील विद्यर्थिनींच्या शैक्षणिक सहकार्यासाठी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत एक विद्यार्थिनी दत्तक घेत ०३ हजार रुपये देणगी रक्कम मुख्याध्यापक उमेश वजराटकर व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोहर पालव यांच्याकडे
सुपूर्द केली.
आतापर्यंत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५३ शाळांमधून ८२ विद्यार्थिनी दत्तक घेत जिल्हयातील मुलींच्या शिक्षणात आपल्या दातृत्वाने मोलाचा वाटा उचललेला आहे. यानिमित्ताने जि.प. प्राथमिक शाळा वेंगुर्ला वडखोल शाळेच्या वतीने चंद्रकांत सावंत यांचा शाल, श्रीफळ व आभारपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी शांताराम परब, सहशिक्षिका पंचफुला मोरे, कु. मानसी पालव आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..