ब्युरो न्यूज /-

सध्या टीव्हीवर एक जाहिरात बरेच वेळा पाहायला मिळते.एका लहान मुलाने ऍप बनवलंय आणि त्यासाठी मोठीमोठी मंडळी एकमेकांसोबत हाणामारी करतायत.व्हाईटहॅट ज्युनिअर या कंपनीची ही जाहिरात आहे. लहान वयातच मुलांना कोडींग आणि ऍपची तोंडओळख व्हावी व ते याच क्षेत्रात मोठे व्हावेत अशी स्वप्ने या जाहिरातीद्वारे दाखवली जातात. या जाहिरातीमुळे अनेक पालक त्यांच्या मुलांना कोडींग शिकवावे या विचारात आहेत. मात्र हे शिक्षण घेतल्यानंतर खरोखर मुलांना कोडींग शिकता येतं का हा प्रश्न आहे, जो असंख्य पालकांना भेडसावत आहे.

कोरा (Quora) नावाच्या प्रश्नोत्तरांच्या मंचावर संख्या पालकांना,भेडसावणाऱ्या या प्रश्नाचे अनन्या मल्टीटेक प्रायव्हेट लिमिटेड के सीईओ, विनय सामंत यांनी उत्तर दिले आहे.त्यात त्यांनी सांगितले आहे की “व्हाइटहॅट ज्युनिअर” हा आयटी क्षेत्रातील अनेक तज्ञांनी चालू केलेला एक स्टार्टअप आहे.हे स्टार्टअप एका जाळ्याप्रमाणे (ट्रॅप) आहे ज्यात एक मूलभुत सुविधा निर्माण केली जाते व त्याचे फार मोठ्या प्रमाणावर उदात्तीकरण केलं जातं.खूप मोठ्या प्रमाणावर जाहिरात केल्याने लोकांचा त्यावर विश्वास बसतो आणि एक प्रकारे ते अपरिहार्य आहे असे वाटू लागते.शिवाय मोठ्या प्रमाणात ऑफर्स (नासा स्पेस प्रोग्राम, सिलिकॉन व्हॅली व्हिडीट इ.) आणि डिस्काऊंटच्या मदतीने ग्राहकसंख्या वाढवली जाते. ऍपचे लाखोंच्या घरात ग्राहक किंवा सबस्क्रायबर झाले की ब्रांड इमेज प्रस्थापित होते. मग मोठे खेळाडू ही व्यवस्था (ऍप) विकत घ्यायला उत्सुक झालेले असतात.

उदा. बायजूज. सामंत पुढे म्हणतात की या ऍपवरून मुलं ऍप बनवायला शिकू शकतात का ? तर याचं प्राथमिक उत्तर ‘होय’ असं देता येऊ शकतो.मात्र हे इतकेच उत्तर अपेक्षित असेल तर पुढे वाचू नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे.विनय सामंत यांचं म्हणणं आहे की “इंग्रजी ही ‘जगाची ज्ञानभाषा’ म्हणून आपण मुलांना लहानपणापसूनच शिकवतो.

त्याचप्रमाणे लहान वयातच मुलांना लॉजीक आणि कोडींगची ओळख झाली तर ते अंगवळणी पडतं आणि भविष्यात कठीण जात नाही. संगणक प्रणालीच्या वापराने मुले लहान वयापासूनच सर्जनशीलता विचार करायला, पद्धतशीरपणे तर्क मांडायला आणि एकमेकांच्या सहकार्याने गटांमधे काम करायला शिकू शकतात आणि 21 व्या शतकातील या सर्वात आवश्यक क्षमता आहेत. जेव्हा मुले कोडींग करतात, तेव्हा ते समस्या सोडवायला, छोट्या मोठ्या प्रकल्पांचे प्लॅन व डिझाइन बनवायला आणि स्वत:च्या
कल्पना मांडायची व साकारायला शिकवतात.” सामंत यांनी त्यांचे हे मत मांडत असताना अमेरीकेतील शिक्षण क्षेत्रातील दिग्गज MIT च्या, मुलांसाठी कोडींग ह्या संकल्पनेला वाहीलेल्या https://scratch.mit.edu/ ह्या संकेस्थळाला भेट देण्याचे आवाहन पालकांना केले आहे.

इथे जगभरातील मुलांना कोडींग शिकता यावे ह्यासाठी पूर्णपणे मोफत मार्गदर्शन मिळतं.आजवर 150 पेक्षा अधिक देशातील 4,78,12,191 मुलांनी इथे आपली नोंदणी केली आहे. इथल्या मार्गदर्शनाच्या बळावर दर महिन्याला 4 लाखांहून अधिक मुले सातत्याने काही ना काही गोष्टी तयार करत असतात.या स्कचचा’ (कोडींगद्वारे तयार केल्या जाणाऱ्या गोष्टी) चा भर मुलांच्या सर्वांगीण प्रगतीवर, मुलांचे भावविश्व अधिक उत्तम करे टावे टंग आहे गं गप गांजी सांगितले आहे.

‘स्कॅचचा’ (कोडींगद्वारे तयार केल्या जाणाऱ्या गोष्टी) चा भर मुलांच्या सर्वांगीण प्रगतीवर, मुलांचे भावविश्व अधिक उत्तम प्रकारे उलगडावे ह्यावर आहे असं सामंत यांनी सांगितले आहे. याचा भर हा ऍप बनवण्यावर आणि पर्यायाने बाजारावर अजिबात नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

विनय सामंत यांनी त्यांच्या 8 वर्षांच्या मुलाचे, शांडील्यचे उदाहरण देऊन गोष्टी समजावून सांगितल्या आहेत. मुलगा खूप चंचल असल्याने त्याला एखाद्या विषयावर लक्ष केंद्रीत करायाल लावून कसे शिकवायचे हा यक्षप्रश्न होता. त्यांना “स्क्रॅच प्रकल्पाची” माहिती मिळाली. त्याला तासभर छोटे मोठे प्रयोग दाखवले. मांजर उड्या कशी मारते, फुलपाखरू कसे उडते अशा स्वरुपाचे ते प्रयोग होते. असे करता करता सामंत यांनी मुलाला विचारले की “आपण गेम बनवूया?” त्यावर तो लगेच तयार झाला. गेम कोणता बनवायचा असं मुलाला विचारल्यावर त्याने ‘फुलपाखरू उडतानाचा काहीतरी मुलाला विचारल्यावर त्याने फुलपाखरू उडतानाचा काहीतरी गेम बनवला’ असं उत्तर दिलं. स्कॉचचा साईटवरील साधनांचा वापर करून सामंत यांनी छोटा फुलपाखराचा गेम तयार केला, ज्यात कीबोर्डच्या मदतीने फुलपाखरू वर-खाली करता येते होते, उडताना सफरचंद मिळाल्यास ते मोठे होत होते आणि नाकतोडा चावल्यास ते मरत होते. यासाठी कुठेही कोडींगची गरज भासली नाही. गेम निर्मितीचे अडीज तास त्यांचा मुलगा एकाच विषयावर मन लावून काम करत होता असं सामंत यांनी सांगितले.

8 वर्षात असं पहील्यांदाच घडल्याचेही त्यांनी सांगितले.गेम पब्लिश केल्यानंतर 2 लाईक आणि प्रतिक्रियाही आल्या होत्या. साऱ्या परदेशातून. प्रतिक्रिया देणाऱ्या एका महिलेने आपल्याला ‘मोबाइलवर’ गेम खेळता येत नसल्याचे सांगितले. इथे शांडील्यमध्ये “मालकत्वाची भावना” जागृत झाली. तिला गेम कसा खेळता येईल यावर शानूने बराच विचार केला, पण त्याला काही सुचलं नाही. आईला ‘काय करू’ असं विचारल्यानंतर तिने एक उत्तर दिलं ज्यातून त्याला महिलेची समस्या दूर करण्याची दिशा मिळाली होती. त्यानुसार शांडिल्य याने त्या महिलेची गेम खेळताना येणारी अडचण दूर केली.

सामंत यांनी मुलावर असाच एक प्रयोग स्थानिक शाळेतल्या मुलावरही केला. त्यांनी ३-४ तास मुलभूत सुचना देऊन मत्स्य संग्रहालय बनवायला सांगितले. 8 मुलांनी ते बनविले आणि
सगळी मत्स्य संग्रहालये एकमेकांपेक्षा पूर्ण वेगळी बनविली होती. प्रत्येक मुलाची सर्जनशीलता, तर्क, विनोदबुद्धी आणि इतर क्षमता भिन्न भिन्न प्रकारच्या असतात. मुलांमधील कल्पनाशक्तीला आणि क्षमतांना वाव मिळायला हवा तर कोडींग त्यासाठी पर्याय आहे, मात्र त्यासाठी भल्या मोठ्ठाल्या फी न भरता, स्नचच्या मार्गानेही हे तुम्ही करू शकता असं सामंत यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page