रत्नागिरी /-
भारतीय हवामान विभाग, मुंबई व मंत्रालय नियंत्रण कक्ष यांचे कडून प्राप्त माहितीनुसार 13 ऑक्टोबर 2020 ते 17 ऑक्टोबर 2020 यां कालावधीत राज्यात विजेच्या कडाकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
विशेषतः किनारपट्टीलगतच्या सर्व जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व यंत्रणांना सावधानतेचा व सुरक्षिततेचा इशारा देण्यात येत आहे.
समुद्र खवळलेला असल्याने मच्छिमारीसाठी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये.
अतिवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे सखल भागात नागरिकांनी सतर्क रहावे. विजेच्या कडकडाटासह वादळी वारा वाहणार असल्याने मोकळ्या जागेत उभे राहू नये. विजेचे खांब, लोखंडी वस्तू, विद्युत वस्तूंपासून दूर रहावे.
वीजा चमकत असताना संगणक, टिव्ही, इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करुन ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा. वीजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. धातूच्या वस्तूपासून दूर रहावे.
नागरिकांनी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी यांनी कळविले आहे.
नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक
जिल्हा नियंत्रण कक्ष-02352-226248/222233
जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष- 02352-222222/100
रत्नागिरी तहसिल नियंत्रण कक्ष-02352-223127
राजापूर तहसिल नियंत्रण कक्ष-02353-222027
लांजा तहसिल नियंत्रण कक्ष-02351-230024
संगमेश्वर तहसिल नियंत्रण कक्ष-02354-260024
चिपळूण तहसिल नियंत्रण कक्ष-02355-252044
गुहागर तहसिल नियंत्रण कक्ष-02359-240237
खेड तहसिल नियंत्रण कक्ष-02356-263031
दापोली तहसिल नियंत्रण कक्ष-02358-282036
मंडणगड तहसिल नियंत्रण कक्ष-02350-225236