शहरात ८ तर ग्रामीण भागात ६ रुग्ण
मालवण /-
मालवण मधील कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला असतानाच मंगळवारी ग्रामीण रुग्णालयात झालेल्या रॅपिड टेस्टमध्ये तालुक्यात तब्बल १४ रुग्ण मिळून आले आहेत. यामध्ये शहरातील ८ जणांचा समावेश आहे. तर ग्रामीण भागात ६ रुग्ण मिळून आले आहेत. देवबाग, चुनवरे, सुकळवाड गावातील हे रुग्ण आहेत.
ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी ४९ जणांची रॅपिड चाचणी करण्यात आली. त्यामध्ये धुरीवाडा येथे एकाच घरात चारजण कोरोनाबाधित मिळाले असून मेढा आणि वायरी आडवण येथे एकाच घरात प्रत्येकी दोन रुग्ण मिळाले आहेत. तर देवबाग, चुनवरे आणि सुकळवाड या तिन्ही गावात एकाच घरात दोन – दोन रुग्ण मिळाले आहेत. मालवण मध्ये एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण मिळून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.