सावंतवाडी /-

गतवर्षी ऑगस्ट व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस गावातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. भरपाई मिळणार या आशेने शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या पायऱ्याही झिझवल्या परंतु हमीपत्राचे कारण पुढे करत प्रशासनाने बाजू मारून नेण्याचे काम केले. तरीही एक नव्हे, दोन नव्हे तब्बल तीन वेळा हमीपत्रे देऊनही नुकसान भरपाई जमा न झाल्याने वंचित शेतकरी आक्रमक झाले आहेत.

पाडलोस गावातील सुमारे 114 शेतकऱ्यांच्या भातपीक व फळपीकांचे 3 लाख 89 हजार 280 रुपयांचे नुकसान झाले होते. त्याची भरपाई मिळणार असे सांगून प्रशासनाकडून केवळ कादगपत्रांचा खेळ सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भरपाईसाठी शेतकऱ्यांनी अनेकवेळा तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिझवल्या. परंतु काही शेतकरी सोडले तर बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप एकही कवडी जमा झाली नसल्याचे भरपाईपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page