वैभववाडीत तालुक्यात कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर..

वैभववाडीत तालुक्यात कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर..

आता पर्यंत 136 कोरोना पॉझिटिव्ह; 2 रुग्णांवर घरी उपचार –

वैभववाडी /-

वैभववाडी तालुक्यात आता पर्यंत 136 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.त्यापैकी 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला .आता पर्यंत 128 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. सध्या 2 कोरोना पॉझिटिव्ह घरगुती उपचार घेत आहेत.त्यामुळे वैभववाडी तालुका सध्या कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर आहे.
वैभववाडी तालुका कोरोना मुक्ती करण्यासाठी आरोग्य विभाग, पोलीस विभाग ,महसूल विभागाचे सर्व अधिकारी ,कर्मचारी ,सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच ,ग्रामसेवक ,सर्व ग्रा.पं.सदस्य व ग्राम सनियंत्रण समिती ,सर्व लोकप्रतिनिधीचे सहकार्य केले आहे.
तालुक्यात सध्या आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम अंतिम टप्प्यात अली आहे.आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन लोकांची तपासणी करत आहेत. वैभववाडी तालुक्याचा सर्व्हे पूर्ण झाला आहे.सध्या ऊन पाऊस सुरू आहे.तालुक्यातील जनतेने सोशल डिस्टन्सचे पालन करावे,मास्कचा वापर करावा,ताप, सर्दी, खोकला आढळून आल्यास स्वतः नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावेत,स्वतः ची काळजी स्वतः घ्यावी असे आवाहन वैभववाडी तालुका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

अभिप्राय द्या..