महिलांवरील अत्याचारा विरोधात तहसीलदार यांना भाजप महिला मोर्चाच्या वतीने देण्यात आले निवेदन

सावंतवाडी /-

महिलांवर वाढलेले अन्याय अत्याचार विरोधात राज्यातील आघाडी सरकारला जाग आणण्यासाठी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने राज्यभर आक्रोश आंदोलन आज पुकारण्यात आले असून, त्याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुका महिला मोर्चाच्या वतीने यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या वतीने नायब तहसीलदार श्री प्रदीप पवार यांना निवेदन देण्यात आले आहे.यावेळी भाजप महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी महिलांवर होणा-या अन्याय व अत्याचार विरोधात सावंतवाडी तहसिलदार कार्यालय येथे मा.नायब तहसिलदार प्रदीप पवार यांना सावंतवाडी महिला मोर्चा तर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी सौ.गीता परब आंबोली मंडल अध्यक्षा भाजपा, सौ.धनश्री गावकर बांदा मंडल अध्यक्षा भाजपा, सौ.श्वेता कोरगावकर जि. प.सदस्य, सौ.प्राजक्ता केळुसकर पं.स.सदस्य, सौ.दिपाली भालेकर नगरसेवक , सौ.मोहिनी मडगावकर, सौ. सलाम बेगम शेख, सौ.मेघना साळगावकर, सौ.अवंती पंडित, सौ.उमांगी मयेकर, सौ.राखी कळंगुटकर, सौ.मिसबा शेख, सौ.बेला पिंटो आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page