ब्युरो न्यूज /-
आपण जेंव्हा एखाद्या नवीन ठिकाणी जातो तेंव्हा कुत्रा गाडिमागे लागण्याच्या घटना सर्रास घडत असतात. नेहमी शांत दिसणारा हा प्राणी एखाद्या धावत्या गाडीला पाहून का बर चवताळत असेल? आज आम्ही तुम्हाला याबद्दलच माहिती सांगणार आहोत.
1• कुत्रा हा इमानदार प्राणी आहे. त्यामुळे त्याचा जिथे जन्म होतो, तेथील परिसर त्याला पूर्ण माहीत असतो
असं म्हटलं जात की, कुत्रेही आपापला परिसर वाटून घेतात. त्यामुळे नवीन गाडी परिसरात आली की त्यांना असुरक्षित वाटू लागते व ते त्यामागे धावू लागतात.
2• आपल्या परिसरात जेंव्हा आपली गाडी उभी असते, त्यावेळेस परिसरातील कुत्रे गाडीच्या चाकावर मूत्रविसर्जन करतात. कुत्र्यांची गंध ओळखण्याची क्षमता उच्च असते. त्यामुळे गाडी नवीन ठिकाणी गेली असता, तेथील स्थानिक कुत्रे तो गंध ओळखतात. त्यांना नवीन कुत्रा परिसरात आल्याची चाहूल लागत असावी त्यामुळे ते गाडीमध्ये धावतात.
3• एक कारण असंही सांगितलं जातं की, जेंव्हा एखादी गाडी उभी असते तेंव्हा कुत्रे त्याखाली जाऊन झोपतात. चालकाचे लक्ष नसल्याने अनवधानाने गाडी सुरू केल्यानंतर खाली झोपलेल्या कुत्र्याचा अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे ते बचावासाठी गाडी खालून बाजूला होतात. मात्र गाडीचा आकार, रंग त्यांच्या स्मरणात राहतो व त्याप्रमाणे दिसणाऱ्या गाडीमागे ते धावत सुटतात. तसेच चालकाला चावण्याचाही त्यांचा प्रयत्न असतो.कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना अजय वाघमारे यांनी ही माहिती दिली आहे.