मुंबई /-
राज्यात काल एका दिवसात नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदविली गेली आहे. गेल्या २४ तासात २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ११ हजार ४१६ नवीन रुग्णांचे निदान झाले.
दरम्यान राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.७६ टक्के एवढे झाले आहे. सध्या २ लाख २१ हजार १५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
▪️आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७५ लाख ६९ हजार ४४७ नमुन्यांपैकी १५ लाख १७ हजार ४३४ नमुने पॉझिटिव्ह आहे. राज्यात काल ३०८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.