▪️मुंबईच्या महिला मंडळाचे कौतुकास्पद पाऊल,हेमंत जाधव..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशामागे त्यांच्या आई जिजाऊ होत्या.आता या जिजाऊंच्या या लेकींना गरज आहे ती. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या विचारांची हाच ध्यास, वसा घेऊन परेल येथील स्वयंसिद्धा महिला मंडळाचे ‘शिवप्रताप’ हे नाटक शनिवार, १३ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वा. मालवण येथील मामा वरेरकर या वातानुकुलित नाट्यगृहात सादर होत आहे.विशेष म्हणजे संपूर्ण नाटकात महिलांच्याच भूमिका आहेत.४५ महिला कलाकारांच्या या आगळ्या वेगळ्या प्रयोगाला दाद देण्यासाठी रसिकांनी उपस्थित राहवे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.या दरम्यात या नाटकाचे लेखक ,दिग्दर्शक असलेल्या सौ.श्रुती लाड यांचे मनसेचे तालुका अध्यक्ष हेमंत जाधव यांच्याकडुन स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

स्वयंसिद्धा महिला मंडळातर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना म्हणून शिवजयंतीनिमित पोवाडा, छोटेसे कथात्मक नाटक, महाराजांच्या इतिहासावर आधारित एकांकिका अशा प्रकारचे कार्यक्रम दरवर्षी सादर व्हायचे. मात्र, २०२३ मध्ये ‘शिवप्रताप’ हे हौशी रंगमंचावर दोन अंकी नाटक सादर केले आणि बघता-बघता नाटक व्यावसायिक रंगमूमीवरही नावारुपास आले. स्वयंसिद्धा महिला मंडळ हे सांस्कृतिक मंडळ आहे. रुढी परंपरा जपणे, त्या पुढील पिढीपर्यंत शिवप्रताप नाटकातील अफजल खान वधाचे दृश्य.पोहोचविणे, अशा ध्येयाने प्रेरित होऊन मंडळाचे कार्य सुरू आहे. महिला जर देश, ऑफिस सक्षमपणे चालवू शकतात, मग रंगभूमीवर पुरुष पात्र का साकारू शकत नाहीत, या विचाराने मंडळाने ‘शिवप्रताप साकारले. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज महिला काम करीत असल्या, तरी अजूनही महिलांना काहीवेळा कमी लेखले जाते. त्या नाजूक आहेत, त्यांना काय कामे जमणार? असे म्हटले जाते. म्हणूनच याच समाजात राहून महिलांनी शिवप्रताप च्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी महिलांनी जास्तीत साकारलेले हे नाटक जास्त रसिकांपर्यंत,

महिलांपर्यंत, पुढील पिढीच्या मुलांपर्यंत पोहोचवून वेगळा इतिहास करण्याचा या मंडळाचा मानस आहे.या नाटकाचे आतापर्यंत ठाणे, परळ आदी भागात अनेक प्रयोग झाले. त्यांना रसिकांनी मरमरून दाद दिली. महाराजांचा हा इतिहास महिलांच्या नव्या रुपात देशभरात पोहोचविण्यासाठी ही चळवळ सुरू आहे. पुस्तकात वाचलेला इतिहास जीवंत स्वरुपात पोहोचविण्याचा स्वयंसिद्धा महिला मंडळाचा प्रयत्न सुरू आहे.

नाटकातील अगदी शिवाजी महाराज,अफजल खान आदी सर्वच पात्रे महिलांनी साकारली आहेत.नाटक पाहताना अंगावर शहारे उमे राहतात. नाटकात आई जिजाऊ व महाराजांचे संवाद प्रेक्षकांना स्तब्ध करतात. बडी बेगम व अफजल खानचा दरबार आदींचे नेपथ्यही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. नाटकात संगीतही असून देवीचा जागरही त्यात होतो. महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, महाराज आणि गोपीनाथ पंत यांच्या मेटीचे प्रसंग मनोवेधक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान गळाभेटीतून वधाचा प्रसंग तर नाटकात हायलाईट ठरतो. महिलांनी केलेल्या या प्रयोगाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक विकास पावसकर व बाबू धुरी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page