▪️गोवा बनावटी दारू अनधिकृत वाळू वाहतूक मात्र राजरोज सुरूच..

✍🏼लोकसंवाद /- समील जळवी सिंधुदुर्ग.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जवळपास सर्वच छोट्या – मोठया लाठी सुरू केल्या असून त्याचा नाहक त्रास हा छोटे -मोठे व्यवसाईक जिल्ह्यातील वाहन चालकांना होत आहे.अनेक ठिकाणी विशेषतः बांदा इन्सुलि लाटीवर चारचाकी वाहनांना अडऊन त्यांची कसून चौकशी केली जात आहे.भाडेकरू वाहने ,जिल्ह्यात आलेले चारमानी,गोवा,चिपी विमानतळावर जाणारे प्रवाशी त्यांच्या गाड्या थांबवले जातात आणि पूर्ण गाडी चेक केली जाते आणि जे राजरोज पणे काळ्या काचा लावून आलिशान गाड्यांनी फिरतात त्यांना मात्र कोणीच विचारणा करत नाही आणि त्यांची गाडी देखील थांबवली जात नाही असे चित्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकंदर दिसत आहे.आणि जे नेहमी दिवस ,रात्री गोवा बनावटी दारूची वाहतूक करणारे,अनधिकृत रित्या वाळू वाहतुक करणारे डंपर यांच्यावर मात्र कोणतीच कारवाई पोलीस करताना दिसत नाही.

कोरजाई, गाडेधाव ,चिपी येथून पाट परुळे मार्गे कुडाळ तसेच सोनवडे,सरंबळ,कवटी, चेंदवन,नेरूर पार कुडाळ अशी अनधिकृत चोरट्या वाळूची वाहतूक मोठया प्रमाणावर होत आहे.याचा महसूल देखील शासनाला मिळत नाही मात्र याकडे जिल्ह्यातिल शासकीय अधिकारी काना – डोळा करताना दिसत आहेत.या सर्व अनधिकृत डंपर वाहतुक ,गोवा बनावटी दारूची वाहतूक कोणाच्या आशिर्वादाने चालत आहे.यांना न थांबवता सर्व गाड्या सोडल्या जातात मात्र जिल्ह्यात आलेले चाकरमानी ,जिल्ह्यातील टॅक्सी,कार व्यवसाईक यांना मात्र थांबउन यांच्या वाहनांची पोलिस कसून चौकशी करताना दिसत आहेत.आणि यांना मात्र नाहक त्रास देत आहेत.यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात प्राशचिन्ह निर्माण झाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळख आहे अश्या प्रकारे पर्यटक व व्यवसाईक यांना त्रास होत असेल तर,जिल्ह्याचे पर्यटन कमी होईल याचा परिणाम जिल्ह्यातील पर्यटनावर होणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हॉटेल व्यवसाय हा पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहे आणि असे प्रकार घडल्यास याचा परिणाम हा व्यापार यावर मोठा होतो.त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन वाढीच्या दृष्टीकोनातून अश्या व्यवसाईकाना नाहक तास देऊ नयेत अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनमधून प्रामुख्याने होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page