सिंधुदुर्ग /-
माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची ससेहोलपट..होत आहे.२०१८-१९ च्या संचमान्यते नुसार जिल्यातील माध्यमिक शाळा मधून शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत त्यांची समायोजन प्रक्रिया माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी सप्टेंबर मध्ये संबंधित शिक्षकांना ओरोस कार्यालयात बोलावून करण्यात आली होती .त्यानुसार ज्या माध्यमिक शाळेत शिक्षकांची पदे रिक्त आहेत त्या शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकाना हजर होण्यास संबंधित अतिरिक्त ठरलेल्या शाळांना कळविले .
त्यानुसार मालवण मधील एका माध्यमिक शाळेतील दोन अतिरिक्त शिक्षकांना तालुक्यातील दोन शाळांमध्ये हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात आले .त्यानुसार अतिरिक्त शिक्षक १ ऑक्टोबर२०२० रोजी संबंधित शाळांमध्ये हजर होण्यास गेले असताना त्या माध्यमिक शाळानी त्यांना हजर करून घेतले नाही किंबहुना त्यांच्याकडील शाळने दिलेले कार्यमुक्ती आदेश न स्वीकारता हजर करून घेण्यास असमर्थता दाखवली . संबंधित शिक्षकांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना या बाबींची कल्पना दूरध्वनीद्वारे दिली असताना तुम्ही त्या शाळेत हजर व्हायचे आहे असे सांगण्यात आले. शेवटी संबंधित शिक्षक माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय मध्ये जाऊन लेखी अर्ज देऊन आपल्या मूळ शाळेत पाठविण्याची विनंती केली परंतु माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी याबाबत कोणत्याही प्रकारचे आदेश दिलेली नाहीत .
त्यामुळे सध्या अतिरिक्त ठरलेले शिक्षक माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात मध्ये जाऊन हजेरी लावून येत आहेत . त्यामुळे सदर शिक्षक अडचणीत आलेले आहेत शिक्षण खात्याने याबाबत निर्णय घेऊन त्या शिक्षकांची होणारी ससेहोलपट व मनःस्ताप थांबवावा अशी मागणी केली जात आहे.