▪️बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविन्द्र चव्हाण यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून दिला 412 कोटीचा निधी..

✍🏼लोकसंवाद /- देवगड.

देवगड: विजयदुर्ग ते कासार्डे हा देवगड तालुक्यातील आणि कणकवली विधानसभा मतदार संघातील महत्वाचा रस्ता आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून दुपदरी व सिमेंट काँक्रिट चा होणार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयदुर्ग किल्ल्याला हा जोडणारा देवगड तालुक्यातील अंत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे.त्याचे साठी 412 कोटी रुपये बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविन्द्र चव्हाण यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून मंजूर केले आहे.या रस्त्याच्या मंजुरी मुळे जनतेतून साधन व्यक्त केले जात आहे.
या रस्त्याची लांबी 52 कि.मी. आहे. या रस्त्याचा समावेश एडीबी योजनेमधुन समावेश झालास असुन या रस्त्याला 412 कोटी रुपयांची मंजुरी राज्य शासनाकडुन मिळालेली आहे. हा रस्ता दुपदरी होणार असुन हा रस्ता पुर्णत: क्रॉकीटचा होणार आहे. 242 पाईप मोऱ्या जुन्या सर्व काढुन नव्याने बांधण्यात येणार आहेत तसेच या रस्त्यावरील सर्व सात पुल तोडुन नव्याने 12 मीटर रुंदीने करण्यात येणार आहेत. सदरचा रस्ता कॉक्रीट चा होणार आहे. त्यामुळे हा रस्ता किमान 20 वर्षे टिकेल तसेच सादर चा रस्ता अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा होणार आहे. यासाठी आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे व बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्‍हाण यांच्याकडुन वेळोवेळी पाठपुरावा करुन हे काम मंजुर करुन घेतलेले आहे.तसेच बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविन्द्र चव्हाण यांनी या रस्त्याच्या साठी 412 कोटी इतका भरघोस निधी उपलब्ध करून दिला या कामाची निविदा प्रक्रिया दि. 27-2-2024 रोजी प्रसिध्द होत आहे. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली चे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड
उपअभियंता श्री बसुतकर कनिष्ठ अभियंता श्री नवपुते यांनी परिश्रम घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page