✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

बेंगलोर कर्नाटका येथील एशियन इंटरनॅशनल कल्चर रीसर्च युनिव्हर्सिटीकडून समाजशास्त्र, सामाजिक सेवा व प्रशासकीय व्यवस्थेतील विशेष प्राविण्याबद्दल “डॉक्टरेट” पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे.रविवार 25 फेब्रुवारी तामिळनाडू होसूर हॉटेल हिल्स येथील आयोजित कार्यक्रमात
देशातील विविध क्षेत्रात आपल्या प्रभावी योगदानातून विशेष प्राविण्य दाखवलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा विद्यापीठाचे कुलगुरू मास्टर व्ही बाबू विजयन,निवृत्त न्यायाधीश डॉ जे हरिदास,श्री श्री महंत योगी जगदीशनाथ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. संघटित व असंघटीत कामगारांच्या कल्याणासाठी घेतलेले उपक्रम, प्रशासकीय व्यवस्था,समाजशास्त्र व सामाजिक सेवा विषयातील विशेष प्राविण्य व योगदानाची दखल विद्यापीठाकडून घेण्यात आलेली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व सामान्यांचे हक्क व अधिकार संरक्षणासाठी आक्रमक व अभ्यासूपणे सामोरे जाणाऱ्या श्री गावडेंना बेंगलोर विद्यापीठाकडुन डॉक्टरेट पदविने सन्मानित करण्यात आल्याने सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page