सिंधुदुर्ग /-
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शासकीय आरोग्य यंत्रणेतील प्रमुख अडचणी व त्यावरील उपाययोजना याबाबत चर्चा व विचार विनिमय करण्यासाठी दिनांक 7/10/2020 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी, सिंधुदुर्ग दुपारी 3 ते 5 यावेळेत आयोजित करण्यात आली आहे.
या सभेत जिल्ह्यातील रिक्त पदे, CCC मधील भयावह परिस्थिती, १२०० बेड ची वर्गवारी, व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड ची सद्यस्थिती, PHC व उपकेंद्र यांचे आधुनिकीकरण, कार्यरत कर्मचाऱ्यांवर जाणीवपूर्वक टाकलेला ताण, त्यांच्या मागण्यांबाबत चालू असलेला दुर्लक्ष, हेळसांड, अर्धवट स्थितीत ठेवलेली डॉक्टर भरती प्रक्रिया ( MBBS, BHMS,BAMS ), COVID-19 च्या पेशंट बाबत ढिसाळ नियोजन, कोरोना पेशंट यांची मृत्यूनंतरही झालेली हाल अपेष्टा, पुढील ३ महिन्याचा नियोजन आराखडा, रुग्णवाहिका वाहनचालक यांच्या अडचणी, कंत्राटी व कायमस्वरूपी भरती बाबत असलेले नवीन शासन निर्देश यासह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुजाण नागरिक, बुद्धिजीवी वर्ग, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था पदाधिकारी/सदस्य यांनी यासभेस उपस्थित राहून सहकार्य व मार्गदर्शन करावे असे आवाहन निमंत्रक डॉ. प्रवीण सावंत, डॉ. गुरु गणपत्ये, डॉ. जयेंद्र परुळेकर, श्री. नितीन तायशेटे, श्री. प्रेमानंद देसाई व श्री. नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.