सिंधुदुर्गनगरी /-
जिल्ह्यातील जनतेच्या तक्रारी,गाऱ्हाणी व सूचना जाणून घेण्यासाठी शनिवार दिनांक 10 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 1 ते 3 या कालावधीत “जनता दरबार” आयोजीत करण्यात आला असून या जनता दरबराचा लाभ जिल्हावासियांनी घ्यावा. असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
सदरचा “जनता दरबार” डी.पी.डी.सी. च्या नविन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आयोजीत करण्यात आला आहे. तरी जनतेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक व सुरक्षित अंतर पध्दतीचा अवलंब करुन सहभागी व्हावे.