कुडाळ तालुक्यात आज सोमवारी एवढे कोरोना रुग्ण सापडले.;वाचा कोण, कोणत्या गावी सापडले

कुडाळ तालुक्यात आज सोमवारी एवढे कोरोना रुग्ण सापडले.;वाचा कोण, कोणत्या गावी सापडले

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज सोमवारी जिल्ह्यातील सापडलेल्या रुग्णांच्या मानाने जास्त म्हणजे १५ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ५ रुग्ण आढळले आहेत. तर तालुक्यात आतापर्यंत ९३० रुग्ण सापडले आहेत. कुडाळ तालुक्यात आज सोमवारी १५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. कुडाळ ५, गुढीपूर ४, वेताळ बांबर्डे २, कसाल ३, साळगांव १ असे रुग्ण आढळले.तसेच तालुक्यात ३४३ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी २९७ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ४६ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकुण रुग्ण ९३० तर बरे झालेले रुग्ण ७१२ आणि सक्रिय रुग्ण १९३ आहेत. आतापर्यंत तालुक्यात २५ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

अभिप्राय द्या..