▪️आरोग्य सुविधांच्या अभावामुळे नाहक जातो आहे सिंधुदुर्गातील नागरिकांचा बळी..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

शिवछत्रपती महाराजांनी पावन केलेल्या पवित्र अशा परशुरामा च्याभूमीमध्ये माननीय देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब सिंधुदुर्गामध्ये त्यांचे ४ डिसेंबर ला आगमन होणार आहे हे सिंधुदुर्ग नागरिकांना अभिमानास्पद आहे सिंधुदुर्गातील नागरिक त्यांचे स्वागत करणार आहेतच

शिवछत्रपती महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून रयतेचा राजा कसा असावा हे सगळ्या जगाला दाखवून दिले त्यांचे प्रत्येक उद्दिष्ट हे रयतेच्या कल्याणासाठी रयतेच्या मर्जीने निर्माण केले होते
आपल्या देशाचे पंतप्रधान जेव्हा सिंधुदुर्गात येतील त्यावेळी महाराष्ट्राचे राजकीय मंडळींनी तसेच जिल्ह्यातील राजकीय समाज सेवक मंडळींनी सिंधुदुर्गाच्या भविष्यासाठी विशेष करून आरोग्य विभाग सक्षम करण्यासाठी अत्याधुनिक सुविधेची हॉस्पिटल उभे राहावे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे देशाच्या इतर राज्यातून पर्यटक मोठया प्रमाणात येत असतात त्यांना तातडीचे उपचार मिळणे आपल्या जिल्हयातील अपघाती रूग्ण व इतर रुग्णांना एर्मजन्सी च्या वेळी एकतर घाटमाथा चढून दुसऱ्या जिल्हयात किंवा दुसऱ्या राज्यात जावे लागते परिणामी रुग्णाना तात्काळ इलाज न झाल्या मुळे रुग्णा दगावतात त्यांचे प्राण वाचण्यासाठी व शासनाने चालु केलेल्या अनेक आरोग्य योजना जिल्ह्यात च उपलब्ध होणे व उपचार होणे साठी श्री मोदी साहेबांकडे निवेदन देऊन शिफारस करावी शासकीय चांगल्या दर्जाचे हॉस्पिटल सिंधुदुर्ग जिल्हयात झाले तर गोरगरीब नागरिकांचे प्राण वाचतील आणि सिंधुदुर्ग तील रूग्णाना उपचारासाठी अजुनही इतर राज्यांमध्ये उपचारासाठी जावे लागत आहे ते बंद होऊन रुग्णांचे प्राण वाचतील ,इतर राज्यांमध्ये उदाहरणार्थ केरळ ,कर्नाटक, गोवा या ठिकाणी शासकीय हॉस्पिटल जनकल्याणसाठी आजही कार्यरत आहे अशाच पद्धतीत आपल्या सिंधुदुर्गामध्ये हॉस्पिटल व्यवस्था व्हावी अशी सर्व सिंधुदुर्गातील नागरिकांची पंतप्रधान मोदी साहेबांकडे अपेक्षा आहे जिल्ह्यातील नागरिकांची भावना श्री मोदी साहेबांपर्यत पोचवण्याची काम स्थानिक राजकीय नेते आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि श्री अजित पवार तसेच . पालक मंत्री मा रविंद्र चव्हाण व सिंधुदुर्गातील स्थानिक राजकीय पुढाऱ्यानी शिफारस आणि निवेदन देऊन माननीय देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्याजवळ सिंधुदुर्ग नागरिकांची भावना पोहचवून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इतर राज्याप्रमाणे सर्व सुविधा आणि डॉक्टर युक्त हॉस्पिटल उभारण्याची शिफारस करतील अशी अपेक्षा आहे अन् सर्व सामान्य लोकांच्या मागणीला जोर धरतील अन् खऱ्या अर्थाने शिवछत्रपतींचा जनकल्याणाचा वारसा पुढे नेतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page