आचरा /-
युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन करणारा आचरा गावचा सुपुत्र सुब्रमण्यम केळकर याची भारतीय पोलीस सेवा (IPS) साठी निवड झाली आहे. त्याच्या या निवडीबद्दल सर्व थरातून अभिनंदन केले जात आहे.
आचरा चिंदर गावचा सुपुत्र असलेल्या सुब्रमण्यम केळकर याने युपीएससी परीक्षेत देशस्तरावर ४९७वा क्रमांक मिळवित उज्वल यश संपादन केले होते.त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत होते. दरम्यान सुब्रमण्यम केळकर याची भारतीय पोलीस सेवा साठी निवड झाली असल्याबाबतचा आदेश प्राप्त झाला आहे. ट्रेंनिगसाठी लवकरच सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैदराबाद येथे प्रशिक्षणासाठी जाणार आहे त्याच्या या निवडी बद्दल सुब्रमण्यम याचे सर्व थरातून कौतुक होत आहे.
सुब्रमण्य केळकर UPSC परीक्षेत परीक्षेत भारत देशातून ४९७ वा येऊन घवघवीत यश संपादन केले होते. ही परीक्षा त्याने मराठी माध्यमातून दिली होती.
त्याने UPSC साठी वैकल्पिक विषय हा राजकीय विज्ञान हा निवडला होता. तयारीसाठी एका हॉस्टेलमध्ये राहुन त्याने तयारी केली होती. यासाठी तो पुण्यातील चाणक्य मंडल परिवार मध्ये शिक्षण घेत होता. अविनाश धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षेचा अभ्यास त्याने केला होता. सरावासाठी तो 10 ते 12 तास अभ्यास करत त्याने यश संपादन केले होते