कुडाळ /-

उत्तर प्रदेश मधील हाथरस या ठिकाणी हल्लीच झालेल्या मनीषा वाल्मिकीच्या बलात्कार प्रकरणी युवा फोरम ,भारत या संघटनेकडून भारताच्या माननीय राष्ट्रपतींना पत्राद्वारे आवाहन केले आहे की,ज्या कुठल्या नराधमांनी सुसंस्कृत मुलीवर अत्त्याचार करून तिचे जे काही हाल केले , तिच्यावर जो बलात्कार करण्यात आला , ह्या गुन्ह्यासाठी त्या गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर संविधानिक कारवाई करावी. त्यांना कुठलीही सवलत न देता,त्यांना सूट न देता त्यांना कठोर शिक्षा लवकरात लवकर सुनवावी.अखंड भारत ह्या नराधमांचा निषेध करत आहे.

भारतासारख्या प्राचीन संस्कृती असलेल्या देशात बलात्कार,महिलांवरील होणारे अत्याचार या गोष्टी लवकरात लवकर थांबण्यात याव्यात आणि यासाठी त्या गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करावी.तसेच पोलिसांच्या अत्यंत बेजबाबदार आणि घृणास्पद वर्तणुकीमुळे युवा फोरम आणि अश्या बऱ्याच संस्था जाहीर निषेध करत आहे.त्यामुळे त्या पोलिसांवर योग्य ती त्वरित कारवाई करावी.अशा प्रकारचे पत्र युवा फोरम , भारत संस्थेच्या पूर्ण महाराष्ट्रातील सर्व प्रदेशांमधून युवा फोरम भारत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवर्धन जयराज राणे ह्यांच्या नेतृत्वाखाली हे अावाहनात्मक पत्र राष्ट्रपतींना पाठवण्यात आले आहे.

“कुठल्याही पक्षासोबत अथवा विरोधात नाही केवळ न्यायाच्या सोबत आणि माझी देशातील प्रत्येक आई-बहीण सुरक्षित रहावी म्हणून हि पत्रे पाठवली आहेत” असे युवा फोरम भारत संघटनेचे संस्थापक संघटना प्रमुख यशवर्धन राणे म्हणाले.या वेळेस यश वर्धन राणे ( संस्थापक संघटना प्रमुख युवा फोरम भारत संघटना) अमोल निकम ( उप प्रमुख ) अनुप जाधव,प्रियांका होडवडेकर, विठ्ठल तळवलकर,देवेश रेडकर,संजना चव्हाण, दर्शन कुडाळकर,रोहन कर मळकर, रमाकांत नाईक, सुयश घाटकर ,जयंत रेगे,प्रसाद पाटकर, सौरभ शिरसाट,शुभम सिंदगीकर,विनोद निकम,भूषण मेस्त्री, करुणा बावकर, राहुल बावकर हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page