▪️नगरसेवक उदय मांजरेकर यांच्या प्रयत्नांना यश..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

कुडाळ शहरातील वार्ड क्रमांक १५ मधील मधली कुंभारवाडी येथील सार्वजनिक विहिरीला नवसंजीवनी मिळाली आहे.मागील वीस वर्षे त्या ग्रामपंचायत कालीन विहिरीची डागडुजी करण्यात आली नव्हती त्यामुळे विहिरीचे बांधकाम पूर्णतः ढासळलेले होते त्या विहिरीला भेगा पडून पायाही खराब झालेला होता अखेर स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार विहिरीची डागडुजी आणि जाळी बसवण्याचे काम नगरसेवक उदय मांजरेकर यांच्या प्रयत्नाने आणि नगरपंचायत प्रशासनाच्या पुढाकाराने विहिरीला नवसंजीवनी मिळाली.यावेळी नगरसेवक उदय मांजरेकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत या विहिरीचे काँक्रिटीकरण रहाट यांचे योग्य पद्धतीने काम पूर्ण केले त्यामुळे मधली कुंभारवाडी येथील ग्रामस्थांनी नगरसेवक उदय मांजरेकर यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page