✍🏼लोकसंवाद /- कुडाळ

तेंडोली येथे आज आयोजित करण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी खासदार व कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी सन्मा. श्री. निलेशजी राणेसाहेब यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेऊन युवक काँग्रेस कुडाळ तालूका माजी उपाध्यक्ष श्री. रामचंद्र राऊळ यांच्यासह अनेक काँग्रेस तसेच उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.

प्रवेशकर्त्याचे स्वागत प्रदेश सदस्य श्री. दत्ता सामंत साहेब, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. रणजित देसाई, कुडाळ तालुका अध्यक्ष श्री. संजय वेंगुर्लेकर यांनी केले. यावेळी प्रदेश सदस्य श्री. बंडया सावंत, ओरोस मंडल अध्यक्ष श्री. दादा साईल, जेष्ठ नेते श्री. राजू राऊळ, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री. रुपेश कानडे व श्री. पप्या तवटे, जेष्ठ भाजपा नेते का. स. नाईक गुरुजी, माजी सरपंच श्री. मंगेश प्रभू, मा. प. स. सदस्य सौ. माधवी प्रभू, ग्रा. प. सदस्य श्री. बाबू राऊळ, श्री. विष्णू तेंडोलकर, बाळा जांभवडेकर, राम बांदेलकर, तन्मय वालावलकर तसेच इतर पदाधिकारी व मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या विभागात भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत करून यापुढील सर्व निवडणुकीमध्ये विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page