आत्मनिर्भर भारत संवाद अभियानाचा कुडाळ येथे समारोप
कुडाळ /-
‘प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा’ सर्व नागरिकांनी लाभार्थी बनुन आत्मनिर्भर बनावे,या योजनेसाठी जवळपास २० लाख कोटीचे पॅकेज ची पंतप्रधान नरेंद मोदी यांनी तरतूद केली आहे.मोदी सरकारने केलेल्या या योजनेचा फायदा सर्व नागरींकानी घ्यावा असे आव्हान भाजपचे केंद्रीय सचिव श्री.विनोद तावडे यांनी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथील आत्मनिर्भर भारत या कार्यक्रमात बोलताना तावडे यांनी सांगितले. भाजपाच्या वतीने नवनिर्वाचित केंद्रीय सचिव श्री.विनोद तावडे यांचे स्वागत करण्यात आले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून आत्मनिर्भर अभियान अंतर्गत मच्छिमारांसाठी मत्स्यसंपदा योजना आणली आहे.या योजनेसाठी २० हजार कोटी ची तरतुद केली आहे.त्याचा फायदा जास्तीत जास्त मच्छिमार बांधवानी घेऊन आत्मनिर्भर बना,असे आवाहन केले.
‘हाथरस’च्या दुर्दैवी घटनेत राजकारण न करता आत्मचिंतन करण्याची गरज राहुल गांधींना विनोद तावडे यांचा टोला लगावला.तसेच कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले पण राज्य शासन अपयशी ठरले- विनोद तावडे यांनी सांगितले.
•कोरोनाच्या संकटात मोदी सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’ ची घोषणा करून संकटातून संधीत रूपांतर करण्याची संधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उपलब्ध करून दिली- विनोद तावडे
•१७५० कोटीचा गहू, २६५० चा तांदूळ जनतेत दिला; रेशनिंग च्या माध्यमातून ५००० कोटींचे अन्नधान्य वाटप झाले; लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकाच्या बँक खात्यात फुल ना फुलांची पाकळी तरी देण्यात आली; आदी शेतकर्यांपासून मजुरांसाठी, महिला बचत गट आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध कामे केलीत- विनोद तावडे
•आत्मनिर्भरमुळे लघुउद्योगांना, फेरीवाल्यांना मिळाली चालना- विनोद तावडे,कोरोना संकटात,’आत्मनिर्भर’मुळे मिळाली उर्जितावस्था मिळाली.असे केंद्रीय सचिव विनोद तावडे आत्मनिर्भर भारत संवाद अभियानाचा कुडाळ येथिल समारोप समारंभात सांगितले.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री.राजन तेली, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर ,जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.समिधा नाईक,अजित गोगटे, नगराध्यक्ष ओंकार तेली,प्रणाली माने,अंकुश जाधव,बंड्या सावंत, अशोक सावंत, सावी लोके, भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष| सौ.संध्या तेरसे ,सावंतवाडी नगरपालिका नगराध्यक्ष श्री.संजू परब,राजू राऊळ ,वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, नगरसेवक विनायक राणे,राकेश कांदे,सुनील बांदेकर अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.