✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
कुडाळ तालुक्यातील माणगाव परिमंडळ अंतर्गत आंबेरी येथे असलेला वनोपज तपासणी नाका बंद करण्यात यावा, असे आदेश मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर रामानुजम यांच्याकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार हा नाका “सील” करण्यात आला आहे, अशी माहिती उपोषणकर्ते जयंत बरेगार यांनी दिली आहे.या नाक्यावर गेली अनेक वर्षे लाकुड वाहतूक करणा-या गाड्या तपासणीच्या नावाखाली अवैध पद्धतीने वाहनांची तपासणी करून आर्थिक वसुली केली जात असल्याचा आरोप श्री बरेगार यांनी केला होता. तसेच हा नाका तात्काळ बंद करण्यात यावा अशी त्यांनी मागणी केली होती. त्यासाठी उपोषणाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर वनसंरक्षक श्री रामानुजन यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत त्यानुसार तो नाका आता सील करण्यात आला आहे. तसा पंचनामा करण्यात आला. अशी माहिती श्री बरेगार यांनी दिली आहे.
