✍🏼लोकसंवाद /- कणकवली.
गेले काही दिवस पावसाने उघडीप घेतल्यानंतर कणकवली तालुक्यात डेंग्यूंच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. तालुक्यात यापूर्वी डेंग्यूचे १५ रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाकडून त्या संबंधित गावांमध्ये तातडीने उपाय योजना हाती घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा आशिये, कलमठ, हरकुळ खुर्द, दारिस्ते, माईण, जानवली या गावात प्रत्येकी एक या प्रमाणे एकूण ६ डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रणिती इंगवले यांनी ही माहिती दिली.
आरोग्य विभागाकडून याबाबत उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून नागरिकांनी देखील सतर्कता बाळगा असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
